Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; ईडीने केला मनी लॉन्ड्रीचा गुन्हा दाखल

Sameer Wankhede in Trouble ED registered a case: IRS समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रीचा गुन्हा दाखल केला आहे.

irs-sameer-wankhede-in-trouble-ed-registered-a-case-of-money-laundering-news-in-marathi-today
irs-sameer-wankhede-in-trouble-ed-registered-a-case-of-money-laundering-news-in-marathi-today

मुंबई:IRS समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रीचा गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं कळत आहे. (IRS Sameer Wankhede in Trouble ED registered a case of money laundering)

सीबीआय ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धरतीवर ईडी ने ECIR दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरोधात कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी भ्रष्टाचाराचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती.

 कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार के पी गोसावी आणि त्याचा साथीदार सनवेल डिसूजा यांनी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून आर्यनला मदत करण्यासाठी 18 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि 50 लाख रुपये घेतल्याचा करण्यात आला आहे. घेतलेले ५० लाख रुपये नंतर परत केल्याचे देखील एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here