Arnab Goswami l अर्णब गोस्वामी भाजपाचा कार्यकर्ता आहे का?;शिवसेनेचा भाजपाला सवाल

शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांचा भाजपाला सवाल

Anil Parab said ST is not privatize in future
Anil Parab said ST is not privatize in future

मुंबई l रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी Arnab Goswami हा भाजपाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब Anil parab यांनी भाजपाला विचारला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. अर्णब गोस्वामीच्या बचावासाठी अमित शाहांपासून आशिष शेलारापर्यंत नेते समोर आले आहेत. यावरून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब Anil parab म्हणाले की,“अर्णब गोस्वामीच्या Arnab Goswami अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही संबंध नसून आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या‌ गुन्ह्यात‌ ही कारवाई करण्यात आली आहे. एका खुनी माणसाला वाचवायचं काम भाजपा करत आहे.

गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचं. सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी Arnab Goswami यांचं नाव होतं‌, नाईक‌ कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर‌ त्यांना तपासाची ‌परवानगी दिली,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

हेही वाचा l rnab Goswami Arrest l फडणवीस सरकारनं अर्णबची चौकशी होऊ दिली नाही

“भाजपा असं ओरडतंय‌‌ जणू काही तो पक्षाचा‌ कार्यकर्ता आहे. यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा‌ प्रश्न कुठे येतो, सुडबुद्धीनं कारवाई करण्यात आलेला आरोप चुकीचा असून अर्णब गोस्वामीला भाजप नेते‌ का‌ वाचवत‌ आहेत?,” अशी विचारणा अनिल परब यांनी केली आहे. “अर्णब गोस्वामी यांना गुन्हेगार म्हणून अटक केलेली नाही, त्यांना तपासासाठी घेतलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

“एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, त्याला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का? महाविकासआघाडीबाबत एवढी लोकं बोलतं आहेत, पण त्यांना आम्ही आत टाकत नाही.

हेही वाचा l महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले?

अर्णब यांच्या तोंडातून काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भिती आहे,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. “कोर्टाच्या आदेशाने प्रकरणाचा नव्याने तपास सुरु असून राज्यात पोलिसांचं राज्य असून त्यांचंच राज्य राहील,” असंही यावेळी ते म्हणाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here