फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत?: हर्षवर्धन सपकाळ

Is Fadnavis the spokesperson for the Election Commission? Why is he answering questions addressed to the Commission?: Harshvardhan Sapkal
Is Fadnavis the spokesperson for the Election Commission? Why is he answering questions addressed to the Commission?: Harshvardhan Sapkal

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा जणू काही आजारच जडला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणवीस का देत आहेत? देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

राहुल गांधी यांनी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांमुळे निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी लेखी स्वरूपात उपस्थित केलेल्या आक्षेपांमुळे मतचोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रश्नांना तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याऐवजी भाजपचे नेते राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यामुळेच फडणवीसांनी राहुल गांधींचा धसका घेतला आहे. मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, अशी अवस्था फडणवीसांची झाली आहे. त्यांना आता प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात. राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याऐवजी राहुल गांधींवर टीका करणे हाच सरकारचा जणू एकमेव कार्यक्रम झाला आहे.

IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्रा. सुर्यनारायण दुल्लांना तत्काळ अटक करा, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा: उदय भानू चिब

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्याची उत्तरे आयोगाने द्यावीत. मुख्यमंत्र्यांनी आयोगाची बाजू मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे अधिक महत्त्वाचे आहे. राहुल गांधींच्या मेंदूची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, उद्ध्वस्त झालेली पिके आणि त्यांच्या कुटुंबांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.

दुष्काळग्रस्त जनतेला आर्थिक मदत कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, हे सांगावे. हे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here