भाजपा मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला, ज्ञानेशकुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मुख्यमंत्री व मंत्री उत्तर का देतात: नाना पटोले

It is the BJP Chief Minister whose brain has been stolen; why do the BJP Chief Minister and ministers answer questions addressed to Gyanesh Kumar? — Nana Patole
It is the BJP Chief Minister whose brain has been stolen; why do the BJP Chief Minister and ministers answer questions addressed to Gyanesh Kumar? — Nana Patole

मुंबई:निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला आहे. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही व संविधान संपवण्याचे पाप ते करत आहेत. निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार व भाजपा यांची अभद्र युती आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणताच भाजपाचे मुख्यमंत्री ज्ञानेशकुमार यांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावतात. खरे तर मेंदू हा भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच चोरीला गेला आहे, असे सणसणीत उत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकार पुराव्यासह बाहेर काढले. भाजपाला फायदा होईल असे काम निवडणूक आयोगातून सुरु आहे. निवडणुकीतील हा भ्रष्ट कारभार बाहेर आला तर भाजपाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही म्हणून भाजपाचे मुख्यमंत्री व अनेक मंत्री ज्ञानेशकुमार यांचा बचाव करत आहेत. दोघे एकमेकाला पाठीशी घालत आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या व्यक्तीने संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम केले पाहिजे पण ते मात्र निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालत आहेत.

ज्ञानेशकुमार हे मनमानी पद्धतीने काम करत आहेत हे देशासाठी घातक आहे. मतदार नोंदणीच्या अर्ज – ६  मध्ये ज्ञानेशकुमारनी मनमानी पद्धतीने बदल केले, लाखो तरुणांची, जाती धर्माच्या लोकांची नावे कापण्याचे काम ठरवून केले जात आहे. प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी ३२ लाख मतांची कपात केली, यातील २७ लाखांची सुनावणी घेतली असे सांगितले जाते, त्यावर इतर दोन निवडणूक आयुक्तांनी हे आम्हाला माहित नाही असे सांगतिले, ही सुनावणी कोणाला विचारून केली गेली. ज्ञानेशकुमार यांच्या मनमानीला इतर दोन आयुक्तांनी आक्षेप घेऊन त्यांचा भाजपाधार्जिणा चेहरा उघड केला आहे, असेही नाना पटोले म्हणाले..

 लोकशाही व संविधान वाचवणाऱ्यांना पाठिंबा..

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात शिवसेना व मनसे मोर्चा काढत आहेत, या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष वा संघटना लढत आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. या युदधात जे कोणी पुढे येत असतील त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मतचोरी व फिक्सिंग केले जात आहे, त्याविरोधात देशातील जनतेने लढा पुकारला आहे. ही तर सुरुवात आहे, लढाई मोठी असून ती सुरुच राहणार आहे. ज्ञानेशकुमारला पदावरून हटवण्यासाठी जे लढत आहेत, त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here