माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढले होते. या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल. https://t.co/AAkrL9Q6T1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2020
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयाचं रोहित पवार यांनी ट्विट करत स्वागत केलं आहे. “जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
वाचा l Salman khan l सलमान खान धावला ‘मेहंदी’ फेम अभिनेता फराजच्या मदतीला
यापूर्वीही कॅगनच्या अहवालाचा हवाला देत रोहित पवार यांनी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. “ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.
वाचा l‘’राज्यपालांचे ‘आ बैल मुझे मार’ सारखे वर्तन, इथे बैल नसून ‘वाघ’आहे’’; शिवसेनेचा टोला
तब्बल ९६३३ कोटी रुपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल, तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.
Hi,
Are you still in business?
I found a few errors on your site.
Would you like me to send over a screenshot of those errors?
Regards
Jacob
(647) 503 0317