BIGG BOSS 14 l मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जान कुमारने मागितली माफी

मनसे-शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कलर्सकडून माफिनामा

Jan Kumar, who said that Marathi language is annoying, apologized
Jan Kumar, who said that Marathi language is annoying, apologized

मुंबई : कलर्स वाहिनीवर बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं jaan kumar sanu मराठी भाषेची  चीड येते, अशा संदर्भातले वक्तव्य केले होते. मनसे, शिवसेनेने शो बंद  करु असा इशारा दिला होता. कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना माफिनामा पत्र पाठवला. त्यानंतर लाईव्ह शोमध्ये जानकुमार सानूनं जाहीर माफी मागितली. पुन्हा चूक होणार नाही अशी ग्वाही राज्यातील जनतेला दिली.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू jaan kumar sanu… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं.

ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणतात की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू jaan kumar sanu तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं देखील खोपकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा l BIGG BOSS 14 l ‘तुला थोबडवणार’….मराठी भाषेची चीड येते म्हणा-या जान कुमारला मनसेची धमकी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सुध्दा जान कुमार सानूच्या jaan kumar sanu प्रकारामुळे इशारा दिला होता. Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. त्या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here