जया बच्चन कंगना,रवी किशनवर भडकल्या

कंगना, रवि किशनने इंडस्ट्रीचा ‘गटार’ असा केला होता उल्लेख

jaya-bachchan-slams-ravi-kishan-kangana-ranaut-comments-about-film-industry
जया बच्चन कंगना,रवि किशनवर भडकल्या jaya-bachchan-slams-ravi-kishan-kangana-ranaut-comments-about-film-industry

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडला ‘गटार’ असा उल्लेख केला होता. इंडस्ट्रीत काम करणारे ९९ टक्के कलाकार हे ड्रग्सच्या अधीन गेल्याचं वक्तव्य कंगनाने केलं होतं. त्यानंतर भाजपा खासदार रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावरूनच “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली.

बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं. सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना टीका करणाऱ्यांची एक लाटच सोशल मीडियावर उसळली. याबद्दल जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे.

“मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या. याआधी अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडला ‘गटार’ म्हटलं होतं. इंडस्ट्रीत काम करणारे ९९ टक्के कलाकार हे ड्रग्सच्या अधीन गेल्याचं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here