“२०२४ मध्ये मोठे धक्के,” देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले…

jayant-patil-criticizes-devendra-fadnavis-claims-will-win-2024-assembly-election-news-update-today
jayant-patil-criticizes-devendra-fadnavis-claims-will-win-2024-assembly-election-news-update-today

मुंबई: २०२४ साली अनेक सरप्राईजेस देऊ, असे विधान भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. फडणवीसांच्या या विधानानंतर आगामी काळात राज्यात कोणती राजकीय उलथापालथ होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांन भाष्य केले आहे. आम्हीच फडणवीसांना २०२४ साली अनेक सरप्राईजेस देऊ असे जयंत पाटील म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे काम केले जाईल
आता सर्व सरप्राईज संपलेले आहेत. आता २०२४ साली सरप्राईज असतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावरच जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. “२०२४ साली लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होईल, असे मी गृहीत धरलेले आहे. हे गृहीत धरूनच आम्ही कामाला लागलो आहोत. अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. त्यातून आगामी काळातील चित्र निराशाजनक नसेल.

२०२४ साली सकारात्मक विचार करून महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे काम केले जाईल. लोक फार हुशार असतात. आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे २०२४ साली आमचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राईज असेल,” अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.

…तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते
“जे जाणारे असतात ते कधीच कोणाचेही नसतात. त्यामुळे त्यांच्या मागे लागायचे नसते. लोक येतात आणि जातात. जे ठाम असतात तेच आपले असतात. कोण कच्चं आहे, कोण पक्कं आहे याबाबत आपल्याला माहिती असते. जोपर्यंत आपल्यात नवी माणसं निवडून आणण्याची ताकद असते तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते. निवडणूक जवळ आल्यानंतर काही लोक येतील तर काही लोक जातील,” असेही जयंत पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here