पाटणा l नितीश कुमार Nitish Kumar यांनी आज सोमवार (16 नोव्हेंबर) रोजी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना शपथ दिली.
Nitish Kumar takes oath as the CM of Bihar for the seventh time. pic.twitter.com/Zq4G8E68nM
— ANI (@ANI) November 16, 2020
या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नितीशकुमार यांच्यासोबत ताराकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
हेही वाचा l भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप,शहीद ऋषिकेश जोंधळेवर अंत्यसंस्कार
बिहारच्या राजकारणात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी ताराकिशोर प्रसाद, रेणू देवी यांची नावं चर्चेत आहेत. शपथविधीपूर्वी काल नितीश कुमार यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असं विधान केल्याने ते चर्चेत आले होते.