JEE Advanced – 2021 परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती

jee-advanced-2021-examination-will-be-held-on-the-3rd-october-2021-news-update
jee-advanced-2021-examination-will-be-held-on-the-3rd-october-2021-news-update

नवी दिल्ली : आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून ही परीक्षा घेतली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

JEE (Advanced) 2021 examination for admission in IITs will be held on the 3rd October 2021. The examination will be conducted adhering to all Covid-protocols, tweets Union Education Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/gIMdwfcKn8

— ANI (@ANI) July 26, 2021

केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर, जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here