JEE Main2021 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; चार टप्प्यात परीक्षा

jee-main-exam-2021-exam-will-be-held-in-four-sessions-first-session-
jee-main-exam-2021-exam-will-be-held-in-four-sessions-first-session-

नई दिल्ली l आयआयटीसह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन्स’ JEE Main 2021  वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ही माहिती दिली.

पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर ४ ते ५ दिवसात निकाल जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

केंद्र व राज्य सरकारांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचाही खोळंबा झाला होता. मात्र, नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जेईई मेन्स JEE Main 2021  परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याची माहिती दिली.

जेईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार टप्प्यात

जेईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार टप्प्यात (सत्रात) घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे.

परीक्षेचा निकाल लगेच जाहीर केला जाणार आहे. परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर चार ते पाच दिवसांत निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचं रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं.

हेही वाचा : प्रताप सरनाईकांवर किरीट सोमय्यांचा पुन्हा नवा आरोप,म्हणाले…

मागील शैक्षणिक सत्रात जेईई व नीट परीक्षांच्या काळातच करोनाचा प्रादूर्भाव झाला होतावा. त्यामुळे अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. विशेष म्हणजे परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली होती.

त्यावरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत रणकंदन झालं होतं. मात्र, आगामी वर्षासाठी सरकारनं आधीच नियोजन करत परीक्षेचं वेळापत्रक निश्चित केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here