नवी दिल्ली l जेईई मेन २०२१ सेशन ४चा निकाल (jee main session 4 result) मंगळवारी रात्री उशीरा जाहीर झाला आहे. या सत्रामध्ये ४४ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत. तर १८ विद्यार्थ्यांनी रँक १ मिळवला आहे. यावर्षी ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेनची परीक्षा दिली होती. जेईई मेन २०२१ मधील टॉप विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा अर्थव अभिजीत तांबट याचे नाव आहे.
या विद्यार्थ्यांनी केले टॉप
२ सप्टेंबरला जेईई मेन २०२१ सेशन ४ची परीक्षा संपली होती. विद्यार्थी ८ सप्टेंबरपर्यंत प्रोव्हिजनल आन्सर कीवर आक्षेप घेऊ शकत होते. त्यानंतर प्रोव्हिजनल आन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासून जेईई मेन्स २०२१चा निकाल jeemain.nta.ac.inवर प्रतिक्षित होता.
असा पहा निकाल
१ – अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ओपन करा
२ – होम पेजवर ‘JEE Main 2021 session 4 results’ लिंकवर क्लि करा
३ – तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिट कोड भरा
४ – माहिती भरल्यानंतर सबमिट करा
५ – चौथ्या सत्रासाठी जेईई मेनचा निकाल समोर येईल
६ – तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि पुढील गोष्टींसाठी त्याची प्रिंट आऊट घ्या
JEE Advanced साठी रजिस्ट्रेशन (JEE Advanced Registration)
जेईई मेन २०२१ चा निकाल घोषित झाल्यानंतर जेईई अॅडव्हान्ससाठी (JEE Advanced 2021) रजिस्ट्रेशन सुरु होईल. जेईई मेन कट ऑफमध्ये टॉप रँक मिळवणारे अडीच लाख उमेदवार जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करु शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर जाऊन जेईई अॅडव्हान्स २०२१ साठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करु शकतात.
JEE Advanced परीक्षा कधी ? ( JEE Advanced 2021 Exam Date)
२३ आयआयटीमध्ये बीटेक आणि युजी इंजिनिअरिंग प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ ला घेतली जाणार आहे.
या वेबसाईट्सवर चेक करु शकता जेईई मेन निकाल २०२१
nta.ac.in,
ntaresults.nic.in,
jeemain.nta.nic.in