
BMC Bharti 2023: मुंबई महानगरपालिकेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी) पदासाठी २७ रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांची माहिती, पात्रता निकष व अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊयात.
मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदे व पात्रता निकष
पदाचे नाव – ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी)
ज्युनिअर स्टेनोग्राफर वृत्तनिवेदक (इंग्रजी) च्या एकूण ९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे इंग्रजी टायपिंगचा वेग ४० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी शॉर्टहॅण्डचा ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव – ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (मराठी)
ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (मराठी) च्या एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे मराठी टायपिंगमध्ये ३० शब्द प्रति मिनिट आणि मराठी शॉर्टहॅण्डचा ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असणे आवश्यक आहे.
• दोन्ही पदांसाठी MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
• खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १८ ते ३८ वर्ष
• मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १८ ते ४३ वर्ष
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई-400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ फेब्रुवारी २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.mcgm.gov.in






















































































































































































