वॉशिंग्टन Washington l अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडेन Joe Biden विजयी झाले. डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांना पराभव पत्कारावा लागला. जो बायडन या निवडणुकीत 273 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.Joe Biden became A new President of A America
गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. मतमोजणीवरुन ठिकठिकाणी वाद सुरू आहेत. जॉर्जियात नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय झाला. या प्रक्रियेमुळे निवडणुकीचा अंतिम निकाल उशीरा लागला.
बायडेन २००९ ते २०१७ या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या कार्यकाळात बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते. ओबामांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. निवडणुकीत पराभव झाल्यास अमेरिकेच्या व्यवस्थेनुसार २० जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प पदमुक्त होतील आणि बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील.
फिलाडेल्फिया येथे मतमोजणी केंद्राजवळ दोन बंदुकधाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून बंदुका जप्त करण्यात आल्या. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अॅरिझोना येथील मतमोजणीला उशीर झाला होता.
बायडेन यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होते. डेमोक्रॅटिक पक्षात (Democratic Party) आनंदाचे वातावरण होते. तर ट्रम्प यांच्या पराभवाची शक्यता दिसू लागल्यामुळे रिपब्लिकन पार्टीचा (Republican Party) मतमोजणीतील उत्साह मावळत असल्याचे चित्र होते.
ट्रम्प यांनी मतमोजणीत गडबड सुरू असल्याचे आरोप करुन न्यायालयात धाव घेतली होती. काही ठिकाणी न्यायालयीन आदेशामुळे नव्याने मतमोजणी सुरू आहे. मात्र बायडेन यांनी विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला होता.
दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाा होता. यात व्हाइट हाऊससमोर एक मोठा ट्रक दिसत आहे. या अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडीओवरुन ट्रम्प यांची आवराआवर करुन व्हाइट हाऊस सोडण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा झाली.





































































































































[…] Joe Biden l जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध… […]