कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे कॅनडामध्ये निधन

kader-khans-elder-son-abdul-quddus-passes-away-in-canada-news-updates
kader-khans-elder-son-abdul-quddus-passes-away-in-canada-news-updates

मुंबई l ज्येष्ठ अभिनेते दिवंगत कादर खान kader-khan यांच्या मोठ्या मुलाचे अब्दुल कुद्दुस Abdul Quddus यांचे निधन Passes-away झाले. अब्दुल हे कॅनडात Canada वास्तव्याला होते आणि तिथल्या विमानतळावर सुरक्षा रक्षकाचे काम करत होते.

अब्दुल कुद्दुस यांच्या निधनाची बातमी बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून दिली. यावेळी त्यांनी अब्दुल यांचा एक फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अब्दुल यांचे नेमके कशामुळे निधन झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, अब्दुल यांच्यावर टोरंटोमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. कादर खान यांनी अजरा खान यांच्याशी लग्न केले होते. त्यांना अब्दुल यांच्याशिवाय सरफराज खान आणि शाहनवाज खान ही दोन मुले आहेत.

या दोन्ही मुलांनी २०१२ मध्ये आपल्या वडिलांच्या मदतीने थिएटरची स्थापना केली होती. त्याचे नाव त्यांनी ‘कल के कलाकार इंटरनॅशनल थिएटर’ असे ठेवले होते.

शाहनवाज-सरफराज दोन्ही मुले सिनेमासृष्टीत
कादर खान यांचा दुसरा मुलगा सरफराज हा अभिनेता आणि निर्माता आहे. सरफराज यांनी २००३ मध्ये सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात काम केले होते. यात त्यांनी सलमानचा जिवलग मित्र असलमची भूमिका साकारली होती.

तर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ चित्रपटात सुद्धा ते सलमानच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते. तर शाहनवाज खान सर्वात लहान मुलगा असून त्याने मिलेंगे मिलेंगे, वादा और हमको तुमसे प्या है या सिनेमांमध्ये असिस्टंट म्हणून काम केले होते.

२०१२मध्ये वडिलांसोबत सरफराज आणि शहनवाज यांनी ‘कल के कलाकार इंटरनॅशनल थिएटरची’ सुरूवात केली होती. अब्दुल कुद्दुस प्रमाणे शहनवाजने देखील अनेकदा कॅनडात असतात. २१ डिसेंबर २०१८ मध्ये कादर खान यांचे कॅनडामध्ये निधन झाले. तेव्हा ते ८१ वर्षांचे होते. कादर खान यांनी बॉलिवूडमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here