Bharat jodo yatra: ‘भारत जोडो यात्रा स्थगित करा’ म्हणणाऱ्या मोदी सरकारवर कन्हैया कुमारांचं टीकास्र; म्हणाले, “पंतप्रधान रात्री…’’

kanhaiya-kumar-criticized-pm-narendra-modi-on-letter-to-stop-bharat-jodo-yatra-news-update-today
kanhaiya-kumar-criticized-pm-narendra-modi-on-letter-to-stop-bharat-jodo-yatra-news-update-today

नवी दिल्ली: चीनमधीन करोनाच्या उद्रेकानंतर केंद्रीय आरोग्य मनसुख मंडाविया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना पत्र लिहीत ‘भारत जोडो’ यात्रा (Bharat jodo yatra) स्थगित करण्याचे आवाहन केले होते. ‘भारत जोडो यात्रे’त करोना नियमांचे पालन होत नसेल, तर ती स्थगित करण्यात यावी, असे ते म्हणाले होते. दरम्यान, यावरून आता काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya kumar) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्र सोडले आहे. ‘भारत जोडो’ यात्रा आज हरिणायातून दिल्लीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषेदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलते होते.

 काय म्हणाले कन्हैया कुमार?

“पंतप्रधान मोदी बंगाल निवडणुकीदरम्यान ‘दीदी ओ दीदी’ करत प्रचार करत होते. तेव्हा करोनाचा डेल्टा व्हेरिएंट होता. तेव्हा त्यांनी मास्कचा वापर केला नाही. मात्र, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी जेव्हा झूम कॉलवर करोनासंदर्भात बैठक होती. तेव्हा त्यांनी मास्क घातले होते. मुळात पंतप्रधान मोदी हे लोकांना मुर्ख समजतात”, अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली.

“मला वाटतं की करोना आणि भाजपाचे विशेष नातं आहे. करोना भाजपाच्या सभेत जात नाही. मात्र, विरोधकांच्या सभेत जातो. मोदी संसदेत करोनाच्या नावाने मास्क घालून येतात. मात्र, रात्री लग्नात जाताना मास्क घालत नाहीत. खरं तर मोदी सरकारने संपूर्ण व्यवस्थेची चेष्टा बनवून ठेवली आहे”, असेही ते म्हणाले.

 “भाजपाच्या मुर्खांना सागां ही करोना ही बिमारी आहे. या बिमारी विरोधात सरकारला पत्र लिहिणारे राहुल गांधी हे पहिले नेता होते. मात्र, भाजपाचे नेते आज राहुल गांधींना करोनाचे नियम पाळायला सांगत आहेत. करोनाच्या बाबतीत काँग्रेस पक्ष गंभीर आहे. करोनाबाबतचे सर्व प्रॉटोकॉल आहे. ते आम्ही पाळू”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here