Karnataka Election Result 2023 : महाबली बजरंगबली भाजपला नाही तर काँग्रेसला पावला!

karnataka-election-final-result-2023-congress-got-clear-majority-in-karnataka-bjp-defeated-news-update-today
karnataka-election-final-result-2023-congress-got-clear-majority-in-karnataka-bjp-defeated-news-update-today

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. निकालानुसार काँग्रेस स्वबळावर सरकार बनवू शकते. काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केला आहे. काँग्रेसने किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या जेडीएसला देखील धडा शिकवला आहे. मुख्यमंत्री पदाची अपेक्षा ठेवणाऱ्या कुमारस्वामी यांना मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसने १३६ जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी १२१ जांगावर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर भाजपला ६४ जागांवर समाधन मानावे लागले. जेडीएसला २० जागा मिळाल्या आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या तुलनेत भाजप आणि जेडीएसला फटका बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४, काँग्रेसला ८० आणि जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या. 

हिमाचल प्रदेशपाठोपाठ भाजपने चार महिन्यांत आणखी एक राज्य गमावले आहे. बसवराज बोम्मई सरकारची काँग्रेसने ४० टक्के कमिशन सरकार म्हणून प्रतिमा मांडली. काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांचा परिणामही निकालावर स्पष्ट दिसत आहे. ध्रुवीकरणाचे राजकारण हे भाजपचे बलस्थान मानले जाते, मात्र यावेळी काँग्रेसने आपले पत्ते चांगले खेळले आणि भाजपला चांगलेच अडकवले.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे होती. ही काँग्रेसची मोठी युक्ती होती. राज्यात सरकार स्थापन करूनही ते बजरंग दलावर बंदी घालू शकत नाही हे काँग्रेसला आधीच माहीत होते.

कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्याचा अधिकार केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे PFI वर आधीच बंदी आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच पीएफईवर बंदी घातली होती. तर काँग्रेसने ही गोष्ट जाहीरनाम्यात टाकली. हा काँग्रेसचा मोठा डाव होता.

 काँग्रेसला कसा झाला फायदा ?

या घोषमुळे भाजपच्या मताधिक्यात वाढ झाली. काँग्रेसला अंदाज होती की राज्यात अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होती. जुन्या म्हैसूरमध्ये भाजप पारंपरिकपणे कमकुवत होता. याठिकाणी काँग्रेस आणि जेडी(एस) यांच्यात थेट लढत होती.

जेडीएसला जितक्या जास्त जागा मिळतील तितके सत्तेपासून जाऊ. हे काँग्रेसला माहीत होते. त्यामुळे काँग्रेसने डबल गेम खेळला. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसने जातीय समीकरण आणि जाहीरणाम्यात ५ आश्र्वासने दिली. तसचे जेडीएस विरोधात लढण्यासाठी काँग्रेसने राज्याच्या १३ टक्के मुस्लिम मतदारांचे ध्रुवीकरण करण्याची रणनीती वापरली.

काँग्रेसच्या या रणनितीचा हिस्सा म्हणजे सरकार आल्यावर बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा. जास्तीत जास्त मुस्लिम हे भाजपला मतदान करत नाहीत. त्यामुळे मुस्लिमांच्या जेडीएसला मिळणाऱ्या मतांमध्ये विभाजन करण्याची योजना काँग्रेसची होती. ही मते काँग्रेसला मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा काँग्रेसच्या कामी आली. मुस्लिम मतदारांनी जेडीएसकडे न वळता मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान केल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here