दणका : अदानी समूहाला विमानतळ न देण्याचा सरकारचा ठराव मंजूर!

kerala-assembly- todays-passes-unanimous-resolution-against-leasing-of-trivandrum-airport
kerala-assembly- todays-passes-unanimous-resolution-against-leasing-of-trivandrum-airport

तिरूअनंतपुरम :  केरळ विभानसभेने तिरुअनंतपुरम विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव आज सोमवारी संमत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांचे कंत्राट अदानी समुहाला देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. (Kerala Assembly withdrawal of Centre’s decision to lease out international airport in Thiruvananthapuram)

केरळ सरकारने आता केंद्राच्या विरोधात दंड थोपटले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारने फेरविचार करावा असं म्हटलं आहे. राज्य सरकारने विमानतळाच्या कारभारातील काही वाटा अदानी समुहाला देण्याची तयारी दर्शवलेली असतानाही केंद्राने हे विमानतळ खासगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे विजयन यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी विमातळाबद्दल राज्य सरकारची भूमिका कायमच स्पष्ट होती असं सांगितलं. विजयन यांनी सरकारची बाजू मांडल्यानंतर विधानसभेचे स्पीकर पी. श्रीरामकृष्णन् यांनी एकमताने ठराव संमत केला जात असल्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here