KGF Chapter2 l रवीना टंडनचा लूक आला समोर

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार

KGFChapter2-raveena-tandon-is-ramika-sen
KGFChapter2-raveena-tandon-is-ramika-sen

केजीएफ चॅप्टर – २’ KGFChapter2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री रवीन टंडन देखील या चित्रपटात दिसणार आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी रवीना टंडन Raveena Tandon तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत असताना ‘केजीएफ चॅप्टर – २’ चित्रपटातील तिचा लूक समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर – १’ या चित्रपटात रवीनाने कोणतीही भूमिका साकारली नव्हती. पण आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केजीएफच्या KGFChapter2 सीक्वेलमध्ये बॉलिवूडमधील काही कलाकरांना घेतले आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन हे बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत.

वाचा l Oily Skin आयुर्वेदिक घरगुती उपायांमुळे तेलकट त्वचेची कटकट होईल दूर

नुकताच रवीनाचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. ती रमिका सेन यांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. दिग्दर्शक प्रशांत यांनी ट्विटर अकाऊंटवर रवीनाचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती.

वाचा l Raghuram Rajanl”अन्यथा देशातील तरुण रस्त्यावर उतरतील”;रघुराम राजन यांचा मोदी सरकारला इशारा

दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here