Kia Sonet एसयूव्ही कार शुक्रवारी होणार लाँच; जाणून घ्या किंमत

25,000 रुपयांमध्ये प्री-बुकींग,जाणून घ्या वैशिष्ट्ये

kia-sonet-will-be-launched-on-september-18
किया मोटर्सची किया सोनेट शु्क्रवारी लॉंच होणार kia-sonet-will-be-launched-on-september-18

बहुप्रतिक्षित Kia Sonet दक्षिण कोरियाच्या किया मोटर्सची  ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही शुक्रवारी (18 सप्टेंबर) रोजी भारतात लाँच होणार आहे. किया सोनेट भारतीय मार्केटमध्ये ह्युंडाई व्हेन्यू, मारुती सुझुकी ब्रेझा, Tata Nexon, महिंद्रा एक्सयूव्ही 300, फोर्ड इकोस्पोर्ट या गाड्यांना टक्कर देईल.

किया सोनेट ही एसयूव्ही सहा व्हेरिअंट्समध्ये लाँच केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.  ही सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही HT Line आणि GT Line या दोन ट्रिममध्ये लाँच केली जाईल. यातील HT Line ट्रिममध्ये ही एसयूव्ही HTE, HTK, HTK+, HTX आणि HTX+ अशा पाच व्हेरिअंट्समध्ये येईल. तर, GT Line ट्रिममध्ये ही एसयूव्ही केवळ GTX+ या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच होईल.

कंपनीने 20 ऑगस्टपासून प्री-बुकिंग घेण्यास सुरूवात केली

किया सोनेटसाठी कंपनीने 20 ऑगस्टपासून प्री-बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी 6,523 जणांनी या एसयूव्हीसाठी बुकिंग केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा किया मोटर्सच्या डीलरशिपमध्ये ग्राहक 25,000 रुपयांमध्ये ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही बूक करु शकतात.

सुरक्षेसाठी Kia मोटर्सच्या या एसयूव्हीमध्ये शानदार फीचर्स

या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, सिक्स स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चे पर्याय मिळतील. कंपनीने या गाडीमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेंन्मेंट सिस्टिम दिली आहे. या सिस्टिमला अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्लेचा सपोर्ट असेल. तसेच, Bose 7 स्पीकर सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. ही कनेक्टेड कार स्मार्टवॉचद्वारे आणि स्मार्टफोनद्वारेही कनेक्ट करता येते. वायरलेस चार्जिंगचं फीचरही यामध्ये आहे. सुरक्षेसाठी Kia मोटर्सच्या या एसयूव्हीमध्ये शानदार फीचर्स आहेत. यात 6 एअरबॅग, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) यांसारखे अनेक दमदार फीचर्स आहेत.

57 कनेक्टेड फीचर्स

कंपनीने सोनेट ही एक कनेक्टेड कार म्हणून सादर केली आहे. यात iMT आणि व्हायरस प्रोटेक्शनसारखे हाईटेक फीचर्स आहेत. या कारला खास भारतासाठी डिझाईन केल्याचे कंपनीने म्हटले आहे. सोनेटमध्येही सेल्टॉसप्रमाणे UVO कनेक्टेड टेक्नोलॉजी आहे. याद्वारे अनेक कनेक्टेड फीचर्स मिळतात. किया सोनेटमध्ये 57 कनेक्टेड फीचर्स असतील असा कंपनीचा दावा आहे. कियाने ही एसयूव्ही इंजिनच्या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. यातील दोन पेट्रोल इंजिन (1.2 लिटर आणि 1.0 लीटर टर्बो जीडीआय) आहेत. तर, तिसरं डिझेल इंजिन( 1.5 लिटर टर्बो) असेल.

इतका देणार मायलेज?

Hyundai Venue पेक्षा किया सोनेट जास्त मायलेज देईल असा खुलासाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये यापूर्वीच झाला आहे. त्यानुसार, किया सोनेट 1.2 लिटर नॅचरल एस्पायर्ड इंजिनमध्ये (5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स) 18.4 किलोमीटर प्रतिलिटर इतका मायलेज देईल. हे इंजिन 83PS पॉवर आणि 115 Nm टॉर्क निर्माण करतं. याच इंजिन आणि ट्रान्समिशनच्या पर्यायात Hyundai Venue चा मायलेज 17.52 kmpl आहे. तर, Kia Sonet 1.0 लिटर टर्बो पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 120PS पॉवर आणि 172Nm पीक टॉर्क निर्माण करते. iMT सोबत किया सोनेटचा मायलेज 18.2 kmpl असेल आणि ही 12.3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते. याशिवाय , 7DCT सोबत सोनेटचा मायलेज 18.3 kmpl असेल. ही 11.3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते. तुलनेने ह्यूंडाई Venue DCT चा मायलेज 18.15 kmpl आहे. याशिवाय Kia Sonet डिझेल 1.5 लिटर इंजिनसोबत 6MT आणि 6AT पर्यायात येईल. दोन्ही पर्यायांसाठी पॉवर आणि टॉर्क आउटपुट वेगवेगळे आहेत. 6MT डिझेल सोनेट 24.1 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते. तर, 6AT सोनेट 19 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते. 6AT पर्यायात येणारी सोनेट डिझेल 11.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरचा वेग पकडते. तर, 6MT ऑप्शन 12.3 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडते. व्हेन्यूचा मायलेज डिझेल इंजिन प्रकारातही सोनेटपेक्षा कमी आहे. व्हेन्यू डिझेल इंजिनमध्ये 23.4kmpl इतका मायलेज देते.

बॆसिक किंमत जाणू घ्या

Sonet च्या किंमतीचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही.  18 सप्टेंबर रोजी कंपनी ही एसयूव्ही लाँच करणार आहे, त्याचवेळी किंमतीचा खुलासाही केला जाईल. पण, मीडिया रिपोर्ट्समध्ये आधीच सोनेटच्या किंमतीबाबत खुलासा झाला आहे. HT Auto मधील रिपोर्टनुसार, कंपनीच्या काही डीलर्सनी Kia Sonet ची बेसिक किंमत 6.99 लाख रुपये असेल. या रिपोर्टनुसार सोनेटच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 13 लाख रुपये असेल. म्हणजेच 6.99 लाख ते 13 लाख रुपयांदरम्यान सोनेटची किंमत असू शकते. या किंमतीनुसार सोनेट मारुतीच्या ब्रेझा आणि महिंद्रा XUV300 पेक्षा स्वस्त ठरते.

या दोन्ही गाड्यांची बेसिक एक्स-शोरुम किंमत अनुक्रमे 7.34 लाख आणि 7.95 लाख रुपये आहे. यासोबतच सोनेट 6.99 लाख रुपये या प्राइस टॅगसह ह्युंडाई व्हेन्यू आणि टाटा Nexon या गाड्यांनाही टक्कर देऊ शकते. या दोन्ही गाड्यांची बेसिक एक्स-शोरुम किंमत अनुक्रमे 6.70 लाख आणि 6.99 लाख रुपये आहे. Kia Motors ने याआधी भारतात Kia Seltos आणि Kia Carnival या दोन गाड्या लाँच केल्या आहेत. तर, Kia Sonet ही कंपनीची तिसरी कार आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपुर येथील प्लांटमध्ये किया सोनेट मॅन्युफॅक्चर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथूनच ही कार जगभरातील अन्य देशांमध्ये एक्स्पोर्ट केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here