kidney Cancer l मूत्रपिंडाच्या कर्करोगाबद्दल जाणून घ्या लक्षणं

kidney-cancer-types-of-treatment-news-updates
kidney-cancer-types-of-treatment-news-updates

मूत्रपिंडाच्या कर्करोगाने सध्या अनेक रुग्ण त्रस्त आहेत. हा आजार कधीही आणि कोणालाही होऊ शकतो. या आजाराची सहसा कुठलीही लक्षणं पटकन दिसून येत नसल्याने या आजाराचे निदान करणं खूपच अवघड असते. याकरिता मूत्रपिंडाचा कर्करोगाबद्दल पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून आजाराचे वेळीच निदान झाल्यास उपचार करण्यासाठी मदत होेते. kidney-cancer-types-of-treatment-news-updates

मूत्रपिंड हे शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचे कार्य करते

मानवी शरीरात मूत्रपिंड हा महत्त्वाचा अवयव आहे. मूत्रपिंड हे शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचे कार्य करते. या व्यतिरिक्त मूत्रपिंड शरीरातील पाण्याचे नियंत्रण, आम्ल आणि क्षारांचे संतुलन, संप्रेरकाची निर्मिती, रक्तदाब नियंत्रण, हाडांचे आरोग्य, हिमोग्लोबिनच्या निर्मितीत साह्य अशी अनेक कार्ये पार पाडत असते.

आपल्या शरीरामध्ये मूत्रपिंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल, तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु ती नीट न घेतल्यास संपूर्ण शरीरावर आणि जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाबाबत जाणून घ्या

रिनल सेल कॅन्सर

मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. परंतु यातील बहुतेकांना मूत्रपिंडातील पेशींची कर्करोग (रिनल सेल कॅन्सर) असतो. मूत्रपिंडातच या कर्करोगाची वाढ होते. कर्करोगाची वाढ होत त्याची मूत्रपिंडातच गाठ तयार होते. गाठ मोठी झाल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होऊन त्याचाही आकार वाढू शकतो.

मूत्रपिंडाच्या बाहेर पडून आजूबाजूचे स्नायू, मणका, यकृत आणि रक्तवाहिन्यांमध्येही तो प्रवेश करू शकतो. जवळच्या लसिकांमध्ये प्रवेश केल्यास हा कर्करोग शरीरभर पसरून इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. प्राथमिक अवस्थेत या गाठीचे निदान झाल्यास उपचार करणं सोपं होतं.

धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा सर्वाधिक

धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा सर्वांधिक असतो. परंतु, त्याचप्रमाणे धुम्रपानाच्या सेवनामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. याशिवाय धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यास निरोगी व्यक्तीलाही कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

मूत्रपिंडाचा कर्करोग हा महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये जास्त आढळून येतो. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा एखाद्याच्या कुटुंबामध्ये मूत्रपिंडासंदर्भात आजारांचा इतिहास असेल, तर त्यांच्यामध्ये मूत्रपिंडविषयक आजारांचा धोका अधिक संभवतो. म्हणून आपल्या मूत्रपिंडाचे आरोग्य कायम चांगले ठेवण्याचे प्रयत्न करावे.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाची ही आहेत लक्षणे

>भूक कमी होणे

>लघवीतून रक्त जाणे

>वजनात घट होणं

>थकवा आणि अशक्तपणा जाणवणं

>गुडघे आणि पायाला सूज येणे

>पाठीत किंवा कमरेजवळ वेदना

>श्वास घेण्यास अडचणी जाणवणे

अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लघवी आणि रक्त तपासणी करावी लागते. याशिवाय अल्ट्रासाऊंड, एमआरआय आणि सीटी स्कॅनद्वारे कर्करोगाचे निदान केले जाते.

कर्करोगाचे निदान करण्यासाठी बायोप्सी देखील केली जाते. या व्यतिरिक्त कर्करोगाचा प्रसार शरीरातील अन्य भागात झालेला आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी पेट स्कॅन आणि हाडांचे स्कॅनिंग केले जाते.

उपचार

मूत्रपिंडाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया हा उत्तम पर्य़ाय आहे. परंतु, कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे रूग्ण पटकन बर होऊ शकतो. मात्र, बऱ्याचदा रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीनुसार काय उपचार द्यायचे हे डॉक्टर ठरवतात.

कधी गाठ काढून टाकली जाते. तर कधी संपूर्ण मूत्रपिंडच काढून कर्करोगातून रूग्णांची सुटका केली जाते. याशिवाय, तोंडावाटे औषधोपचार आणि इम्युनोथेरपीही रूग्णांना देण्यात येत आहे. इम्युनोथेरपी औषधे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीची आणि शरीराच्या इतर भागापर्यंत त्यांची काळजी घेते.

त्यांचे साइड इफेक्ट्स पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणूनच हे उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या ऑन्कोलॉजिस्टशी चर्चा करणं गरजेचं आहे. जेणेकरून उपचार दरम्यान होणारे साईड इफेक्टस कमी करता येऊ शकतात. याशिवाय कर्करोगाचे वेळीच निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here