Komaki Ranger 2023 Upgrade Model: भारतामध्ये मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रिक बाईक्सची क्रेझ वाढल्याचे दिसते. देशातील मोठ्या कंपन्या विजेवर चालणाऱ्या बाईक्स, स्कूटर्स बनवत आहेत. याच धर्तीवर कोमाकी या इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माती कंपनीने भारतातील पहिली क्रूझर बाईक तयार केली. या क्रूझर बाईकला त्यांना ‘कोमाकी रेंजर’ (komaki ranger) असे नाव दिले. बजाज एव्हेंजर किंवा हार्ले डेविडसनच्या बाईकसारखी दिसणाऱ्या कोमाकी रेंजरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच कोमाकी कंपनीने या क्रूझर बाईकचे अपग्रेड व्हर्जन भारतामध्ये लॉन्च केले. देशभरातील कोमाकी रिटेल स्टोर्समध्ये कोमाकी रेंजरचे अपग्रेड व्हर्जन उपलब्ध आहे.
कोमाकी रेंजरचे फीचर्स
ऑल-न्यू कोमाकी रेंजरमध्ये ऑनबोर्ड नॅविगेशन आणि साउंड सिस्टीम यांच्यासह 7.0-इंच टीएफटी स्क्रीन बनवण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या बाईकने २००-२५० किलोमीटर प्रवास करता येतो. पूर्वी ही क्षमता १७० ते २०० किमी इतकी होती. याशिवाय कोमाकी रेंजरच्या बॅटरी स्टोरेज क्षमतेमध्येही वाढ करण्यात आली आहे. बॅटरी स्टोरेज ५० लीटर इतके करण्यात आले आहे. यातील इलेक्ट्रिक मोटर ४००० w वरुन ५००० w करण्यात आली आहे. नव्या अपग्रेड मॉडेलमध्ये एडजस्टेबल रियर सस्पेंशन आणि स्मार्ट बॅटरी अॅकप्लिकेशनसह ४-५ किलोवॅट लिथियम बॅटरी बसवलेली आहे.
कोमाकी रेंजरची किंमत
भारतात कोमाकी रेंजर लॉन्च केल्यानंतर या बाईकची किंमत १ लाख ६० हजार इतकी होती. या इलेक्ट्रिक क्रूझरच्या नव्या अपग्रेड मॉडेलची एक्स शोरुममधील किंमत १ लाख ८५ हजार इतकी आहे असे म्हटसले जात आहे.
कोमाकी इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख गुंजन मल्होत्रा यांनी कोमाकी रेंजरच्या नव्या मॉडेलबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, नव्या रेंजर बाइकसह आम्ही भारतामध्ये एक स्थानी स्थान प्राप्त करण्याचा दावा करत आहोत. कोमाकी रेंजरला प्रीमियम बनवणे हे याच्या नव्या अपग्रेडमागील प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त आम्ही ग्राहकांसाठी सर्व विभागातील वाहने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत.