Laptops l ३५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे लॅपटॉप !

laptops-for-college-students-under-rs-35000-news-update
laptops-for-college-students-under-rs-35000-news-update

लॉकडाउनमुळे सर्वच शासकीय आणि निमशासकीय संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या लेक्चर्स आणि परीक्षेपर्यन्त सगळच घरीच बसून काम केलं जात आहे. या गोष्टी करतांना नाही म्हंटल तरी फोन कमी पडतोच. त्यामुळे कामासाठी, अभ्यासासाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटरची गरज भासतेच. विद्यार्थी अभ्यासासह गेमिंगसाठीही लॅपटॉपचा वापर करतात. सध्या गेमिंग फार ट्रेण्डमध्येही आहे. हीच सगळी गरज बघून विद्यार्थांच्या खिशाला परवडतील असे ५ प्रसिद्ध कंपन्यांच्या लॅपटॉपची माहिती देत आहोत. या सगळ्या लॅपटॉपची किंमत ३५,००० पेक्षा कमी आहे.

एचपी २४५ जी ८ (HP 245 G8)

कमी वापरासाठी आणि कधीतरी गेम खेळणाऱ्यांसाठी हा लॅपटॉप उत्तम आहे. लॅपटॉपमध्ये रायझन 3 एपीयूसह वेगा 6 ग्राफिक्स आहेत. हा लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम आणि 1 टीबी एचडीडी स्टोरेज देखील आहे. याची किंमत साधारणपणे ३१ हजारांपर्यंत आहे.

लेनोवो आयडियापॅड ड्युएट क्रोमबुक Lenovo Ideapad Duet Chromebook

लेनोवो आयडियापॅड ड्युएट क्रोमबुक हा २७,००० या कींमतीला एक उत्तम नोटबुक आहे. १०.१ इंचाच्या या नोटबूकमध्ये ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि मीडियाटेक पी 60 टी ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. आपल्याला केवळ स्क्रीनवरूनच काही काम करायचं असेल अथवा काही बघायचं असेल तेव्हा तुम्ही याचा कीबोर्डदेखील देखील वेगळा करू शकता.

आसुस व्हीवोबुक M515DA-EJ301T (Asus Vivobook M515DA-EJ301T)

एसुस व्हीवोबुक M515DA-EJ301T हा लॅपटॉप एएमडी रायझन ३ ३२५०यु प्रोसेसरसह इंटिग्रेटेड रेडियन ग्राफिक्ससह येतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि १ टीबी एचडीडी स्टोरेज आहे. या १५.६ इंचाच्या लॅपटॉपमध्ये विंडोज १० आहे. परंतु यात पूरक मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॅकेज नाही.

एचपी क्रोमबुक x ३६० (Chromebook x360)

एचपी क्रोमबुक x ३६० मध्ये इंटेल सेलेरॉन एन ४०२० प्रोसेसर आणि १२ इंच स्क्रीन आहे. टॅब्लेट-सारखी या नोटबुकची टचस्क्रीन पूर्णपणे फ्लिप केली जाऊ शकते. ड्युअल-अ‍ॅरे (dual-array)मायक्रोफोनसह एक एचपी ट्रूव्हिजन एचडी कॅमेरा देखील यात आहे.

HP 15s-gr0006au

एचपी 15s-gr0006au चांगली पॉवर आणि खिशाला परवडणार्‍या लॅपटॉपपैकी बेस्ट लॅपटॉप आहे. यातही ४ जीबी रॅम, १ टीबी एचडीडी आणि विंडोज १० होमसह एएमडी रायझन 3-3250U आहे. या १५.६ इंचाचा लॅपटॉपमध्ये एएमडी रॅडियन ग्राफिक्स आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट २०१९ देखील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here