लता मंगेशकर यांच्या इमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण

पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटी सील

lata-mangeshkar-building-sealed-due-to-corona-virus-5patiint
lata-mangeshkar-building-sealed-due-to-corona-virus-5patiint

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळले. (lata-mangeshkar-building-sealed-due-to-corona-virus-5patiint) खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने लता मंगेशकर यांची इमारत सील केली.

मुंबईमधील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत.

सोसायटी सील केल्याची बातमी समजताच लता मंगेशकर आणि कुटुंबीयांची विचारपूस करणारे फोन येई लागले. त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली. सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here