Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक

शनिवारी पुन्हा लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले.

lata-mangeshkar-health-empress-critical-news-update-today
lata-mangeshkar-health-empress-critical-news-update-today

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती शनिवारी पुन्हा खालावल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना न्यूमोनियाही झाला होता.

गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. त्यांनी अन्नग्रहणही सुरू केले होते. त्यामुळे काही दिवसांत त्या घरी परततील, असे वाटत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

मात्र शनिवारी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर पुन्हा अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे डॉ. समदानी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here