लता मंगेशकर यांनी उद्धव ठाकरेंचे ‘या’ कारणासाठी मानले आभार!

प्रभुकुंज सोसायटीमध्ये आढळले होते पाच कोरोना रुग्ण

Lata Mangeshkar thanks CM Uddhav Thackeray for care and effective management
Lata Mangeshkar thanks CM Uddhav Thackeray for care and effective management

मुंबई : जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विटरवरुन आभार व्यक्त केले आहेत. मंगेशकर कुटुंब राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे सील केल्यानंतर योग्य काळजी घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही लता मंगेशकर यांनी आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद दिले. (Lata Mangeshkar thanks CM Uddhav Thackeray for care and effective management of sealed Prabhu kunja building)

लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटीमध्ये पाच कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मुंबई महापालिकेने चार दिवसांपूर्वी सील केली होती. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी आभार मानले,

लता मंगेशकर म्हणाल्या नमस्कार…

 “नमस्कार, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे मनापासून आभार. तसेच सीलबंद इमारतींच्या देखभाल व प्रभावी व्यवस्थापनासाठी डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांचा विशेष उल्लेख.” असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लता मंगेशकर यांचे मानले आभार

“आदरणीय दीदी, नेहमीप्रमाणेच निश्चल प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लता मंगेशकर यांचे आभार मानले.. (Lata Mangeshkar thanks CM Uddhav Thackeray for care and effective management of sealed Prabhukunja building)

प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह बंधू हृदयनाथ मंगेशकर, बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीही आहेत. त्यामुळे सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या एकमताने सील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here