सौंदर्य खुलवण्यापासून ते भांड्यांचा चिकटपणा घालवण्यापर्यंत लिंबाच्या सालीचा वापर केला जातो. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असतात. त्यामुळे लिंबामधील फायबरचा पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोग केला जातो. लिंबाच्या रसाचा वापर करून झाल्यानंतर अनेकजण त्याची साली फेकून देतात. परंतु लिंबाच्या सालीचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो.
कशाप्रकारे लिंबाच्या सालीचा वापर केला जातो त्याच्यावर एक नजर…
लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.
हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते.
चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर जमा होणारा काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.
लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करण्यासाठी करु शकता.
जेवणाच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपणा जात नाही. अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.
कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो. अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी. सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.
फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर लिंबाच्या साली ठेवाव्या. सालींच्या वासाने फ्रिजेमधील दुर्गंधी कमी होते.
घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी. असे केल्याने मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.