मोदींनी शेतकऱ्यांच्या रक्ताने स्वतःचे हात रंगू नयेत;राजू शेट्टींचा हल्लाबोल

like-stalin-modi-should-not-paint-his-own-hands-with-the-blood-of-farmers-says-raju-shetty
like-stalin-modi-should-not-paint-his-own-hands-with-the-blood-of-farmers-says-raju-shetty

कोल्हापूर l शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन Farmer protest सुरु असताना मागील रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. स्टॅलिनप्रमाणे stalin पंतप्रधान मोदी PM MODI यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताने स्वतःचे हात रंगू नयेत, असा इशारा वजा सल्ला राजू शेट्टी Raju shetty यांनी मंगळवारी दिला.

कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पंजाबमध्ये शेतकरी चळवळ गेली चार दशके सुरू आहे.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही चळवळ नीट समजून न घेतल्याने शेतकऱ्यांची पोरे असामाजिक तत्वांच्या आहारी गेली. देशाला तत्कालीन पंतप्रधानांना गमावण्याची वेळ आली होती. याची आठवण करुन दिली.

शेट्टी यांनी शेतकरी आंदोलनावरून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,रावसाहेब दानवे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.ते म्हणाले , मी हाडाचा शेतकरी आहे; कागदावरचा नाही. दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत माझ्य्बाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारणा केली असता स्पष्टीकरण दिले नाही.

उलट पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून ते उठून गेले. असे बोलणे केंद्रीय मंत्री असलेल्या दानवे यांना शोभत नाही. दानवे यांना चीनमधून धमकी आली असावी म्हणून ते पत्रकार परिषदेत मधूनच उठून गेले असावेत, असा चिमटाही त्यांनी काढला. 

हेही वाचा : अमृता फडणवीस यांनी ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून गाणं धांबवावं ऑनलाईन याचिका दाखल

कोणत्याही भ्रष्टाचाराचे समर्थन अजिबात केले जाणार नाही. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविषयी देवेंद्र फडणवीस यांनी जरूर पुस्तक काढावे. पण गाडीभर पुरावे काढून गाडीच गायब होऊ नये याची काळजी घ्या, असा टोला शेट्टी यांनी मंगळवारी लगावला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष कोण असावेत हा पक्षांतर्गत मामला आहे. पण चंद्रकांत पाटील माझ्याबाबत काहीही बोलत असतील तर ते ऐकून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा : Dry ginger benefits l जाणून घ्या सुंठ पावडर खाण्याचे फायदे

सदाभाऊ खोत यांच्या दुग्ध अभिषेक आंदोलनावर टिपणी करताना शेट्टी म्हणाले, खोत हे कुठल्यातरी तीर्थक्षेत्राला जाऊन आल्याने कदाचित ते कृषी कायद्यावर दुग्धाभिषेक करत असतील असा टोमणा मारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here