कानदुखीपासून ते पोटदुखीपर्यंत पावटा खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे

lima-beans-benefits-paota
पावट्याचे गुणकारी फायदे lima-beans-benefits-paota

पावट्याच्या शेंगा पावटा अनेकांना आवडत नाही. परंतु, पावटा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात कानदुखीपासून ते पोटदुखीपर्यंत ते अनेक आजारांवर पावटा गुणकारी आहे.

हे आहेत फायदे

कान ठणकत असेल तर अशा वेळी पावट्याचा रस गाळून त्याचे २ थेंब कानात टाकावा. यामुळे ठणका लगेचच कमी होतो.

आम्लपित्ताच्या त्रासामुळे पोटात जळजळ होत असेल तर पावट्याच्या शेंगाचा काढा प्यावा.

अनेकदा स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो अशावेळी पावटा किंवा पावट्याच्या शेंगाचा काढा उपयोगी ठरतो.

भूक कमी लागणे, अपचन होणे यासारख्या विकारात पावटा खावा.

ताप कमी करण्यासाठी पावट्याचा रस प्यावा.

ओटीपोट व कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी पावटय़ाची भाजी नियमितपणे आहारात खावी.

जुनी जखम किंवा शरीराच्या एखाद्या भागावर वेदना जाणवत असतील तर पावट्याची भाजी खावी.

 (तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here