Netflix, Amazon Prime ला टक्कर,आलं नवीन ओटीटी ‘लायन्सगेट प्ले’अ‍ॅप

99 रुपये महिना भरा,हॉलिवूडमधील प्रीमियम कंटेंट अनेक भारतीय भाषांमध्ये

lionsgate-play-officially-launched-in-india-by-starz
lionsgate-play-officially-launched-in-india-by-starz

Netflix, Amazon Prime ला टक्कर देण्यासाठी प्रीमियम ग्लोबल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म premium global streaming platform Starz ने भारतात आपलं स्वतंत्र डायरेक्ट टू कन्झ्युमर ओटीटी अ‍ॅप ‘लायन्सगेट प्ले’ lionsgate play लाँच केलं आहे. लायन्सगेट प्ले अ‍ॅपवर हॉलिवूडमधील प्रीमियम कंटेंट अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

भारतात लायन्सगेट प्लेची नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी-5, हॉटस्टार आणि एमएक्स प्लेयर यांसारख्या लोकप्रिय ओटीटी अ‍ॅप्ससोबत असेल.

लायन्सगेट प्ले अ‍ॅपमध्ये ओरिजिनल फिचर फिल्म्सशिवाय टीव्ही शोज, अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि कॉमेडी अशा विविध कंटेंट आणि प्रीमियरचा समावेश आहे.

लायन्सगेट प्लेने दोन प्लॅन आणले आहेत. त्यातील एक 699 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता एक वर्ष आहे. तर, मंथली प्लॅनची किंमत 99 रुपये आहे.

लायन्सगेट प्ले अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि अ‍ॅमेझॉन फायरस्टिक या तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

हेही वाचा l Anvay naik l अन्वय नाईक प्रकरण,आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामींची पुन्हा हायकोर्टात धाव

Starz एक आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे. सर्वप्रथम 2018 मध्ये हे अ‍ॅप लाँच झालं होतं. हे युरोप, लॅटिन अमेरिका, कॅनडा, जपान आणि भारतासह 55 देशांमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लायन्सगेट प्ले अ‍ॅपवर जेनिफर लोपेज अभिनीत हस्लर्स, गेराल्ड बटलरचा साहसी थरारपट ‘एंजल हॅज फॉलन’, ह्यूज ग्रांट अभिनीत साहसी विनोदपट ‘द जेंटलमेन’ यांसारखे अनेक सिनेमे बघता येतील.

हेही वाचा l हेही वाचा l एकटेच लढणार व जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here