Mumbai local train l लोकल सुरु झाल्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा दावा

local-trains-may-be-behi-corona-cases-going-up-municipal-commissioner-iqbal-singh-chahal
local-trains-may-be-behi-corona-cases-going-up-municipal-commissioner-iqbal-singh-chahal

मुंबई: राज्यासह मुंबईत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या Corona cases वाढत आहे. मुंबईतील कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. मुंबईत करोना रुग्णवाढीमागे लोकल ट्रेन एक कारण असू शकते असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल Iqbal-singh-chahal यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मार्शल्सची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईमधील या रुग्णवाढीसाठी लोकल सेवेकडे बोट दाखवले जात आहे.“मुंबई लोकलमधून दिवसाला ५० लाख लोक प्रवास करतात. मागच्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून ते ३१ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती.

वाचा: Netflix l आपोआप डाउनलोड होणार आवडते सिनेमे-वेबसीरिज, नेटफ्लिक्सने आणलं ‘हे’ फिचर

एक फेब्रुवारीपासून आपण सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु केली. लोकलमुळे करोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होतेय का? हे समजायला तीन आठवडे लागतील, असे त्यावेळी मी म्हटले होते. आत लोकल सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. करोनाकाळात मोठया प्रमाणात लोकल ट्रेनमधुन प्रवास सुरु आहे. त्यामुळे रुग्णवाढीचा लोकलशी संबंध असू शकतो” असे इक्बाल सिंह चहल म्हणाले.

वाचा: Mumbai-saga l ‘मुंबई सागा’ सिनेमाचा टीझर रिलीज,पाहा व्हिडिओ

“आम्ही महत्त्वाच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांबरोबर बैठक केली आहे. कोविंड सेंटर आणि जम्बो फिल्ड हॉस्पिटल सक्रिय करत आहोत, असे चहल यांनी सांगितले. रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस करोना रुग्ण संख्या वाढल्यानंतर मंगळवारी करोना रुग्ण संख्येत काहीशी घट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, नागरिकांनी करोना रोखण्यासाठी सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाउन करावे लागेल असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here