LPG cylinder : एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

LPG-Price-Hike-price-of-domestic-lpg-cylinder-increased-by-rs-50-with-effect-from-today-news-update
LPG-Price-Hike-price-of-domestic-lpg-cylinder-increased-by-rs-50-with-effect-from-today-news-update

मुंबई: इंडियन ऑइलने (Indian oil) नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (Lpg cylinder) दरात १०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.

नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. ही कपात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर करण्यात आली आहे. आयओसीएलच्या मते, १ जानेवारी २०२२ पासून मुंबईतील व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्तने कमी होऊन १९४८.५० पर्यंत खाली आली आहे.

३१ डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना १९ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी २०५१ रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत आता १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी २१३१ रुपये, दिल्लीत १९९८.५ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन किंमती जाहीर झाल्यानंतर, कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर आता आजपासून २०७६ रुपयांना खरेदी करता येणार आहेत.

नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळेच मुंबईत राहणाऱ्या लोकांना घरगुती गॅस सिलेंडर ९०० रुपयांना अनुदानाशिवाय मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये ९००, कोलकातामध्ये ९२६, चेन्नईमध्ये ९१६, लखनऊमध्ये ९३८, पटनामध्ये ९९८ रुपयांना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here