54 प्रवाशांनी भरलेली बस सरोवरात कोसळली; 42 मृतदेह काढले बाहेर

madhya-pradesh-sidhi-satna-bus-accident-update-bus-carrying-54-passenger-falls-into-river-in-madhya-pradesh-rampur-rescue
madhya-pradesh-sidhi-satna-bus-accident-update-bus-carrying-54-passenger-falls-into-river-in-madhya-pradesh-rampur-rescue

रामपूर, मध्य प्रदेश:  मध्य प्रदेशच्या सीधी येथे सकाळी प्रवाशी बसला मोठा अपघात घडला. Madhya-pradesh-sidhi-satna-bus-accident या ठिकाणी सकाळी 7 वाजेच्या सुमारास 54 प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावरून घसरून थेट बाणसागर सरोवरात कोसळली. या तलावातून 42 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 6 प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले. रामपूर जिल्ह्यातील नेकीन परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या बचाव कार्य जोरदार सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. बसमधध्ये 54 प्रवाशी होते. नेकीन परिसरात आली असताना बस रस्ता सोडून थेट सरोवरमध्ये पडली. सरोवरातील पाण्याचा वेग जास्त असल्याने बचाव पथक पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने यात पडलेले लोक दूर वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसची क्षमता केवळ 32 प्रवाशांची होती. त्यात 54 प्रवाशी ठासून भरले होते. सीधी मार्गावरून बस सतनाकडे जात होती.

ट्रॅफिक असल्याने चालकाने नेहमीचा रूट बदलला. बस सरोवराला खेटून काढणे अतिशय धोकादायक होते. येथे रस्ता अतिशय अरुंद आहे. याच दरम्यान बसवरून चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट सरोवरात घसरली.

हेही वाचा:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक; भीषण अपघातात पाच ठार,पाच गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे पर 5 गाड़ियों में टक्कर; 5 लोगों की मौत,5 घायल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here