रायगड l महाडचे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष Maharashtra Pradesh Congress Committee Vice President माणिकराव जगताप Manikrao Jagtap यांचे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/tzc3VskS76
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 26, 2021
माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. आज दुपारी 2 वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,नामदार अशोक चव्हाण यांनीही ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आमचे मार्गदर्शक, उत्तम वक्ते, उत्तम संघटक, रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, माज़ी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन झाले आहे.
मी जगताप परीवाराच्या विशेषत: त्यांची कन्या आमची बहिण महाडची नगराध्यक्षा स्नेहल व चिरंजीव श्रीयश यांच्या दुःखात सहभागी आहे. pic.twitter.com/1pblDIPK4v— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 26, 2021
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. pic.twitter.com/LtpjkUbntb
— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 26, 2021