Maharashtra Bandh l केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा महाराष्ट्र बंदला विरोध – नवाब मलिक

dcm-devendra-fadnavis-letter-on-ex-minister-nawab-malik-participation-in-mahayuti-news-update-today
dcm-devendra-fadnavis-letter-on-ex-minister-nawab-malik-participation-in-mahayuti-news-update-today

मुंबई: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने (Maha vikas aghadi) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur violence) येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे देखील या बंदमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाद्वारे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र बंदमध्ये लोक सहभागी होत आहेत. जनतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे आणि या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ काढून टाकले पाहिजे ही आमची मागणी आहे.

आम्ही सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानतो की त्यांनी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका स्विकारली. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही. कुठलेही नुकसान करायचे नाही. शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

“सुरुवातीपासून गुन्हा दाखल करावा हीच आमची मागणी आहे. सुरुवातीला गुन्हा दाखल होत नव्हता. त्यानंतर दबाव निर्माण झाल्यनंतर अटक झालेली आहे. जो पर्यंत गृहराज्यमंत्री त्या पदावर आहेत या प्रकरणात तपास होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांचा राजीनामा गरजेचा आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

पुणे आणि नागपूरमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आहे,असा प्रश्न विचारल्या नंतर नवाब मलिकांनी भाष्य केले आहे. “केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा विरोध आहे. सगळ्या मोठ्या संघटनांनी बंदला समर्थन दिले आहे. राज्यभर दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा अडवण्यात आलेल्या नाहीत. भाजपाला विरोध करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिल्याने तो यशस्वी झालेला आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here