Medical officers Retirement Age 62 l ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षे

1160-crore-package-for-teachers-all-demands-accepted-benefit-to-60-thousand-teachers-education-minister-deepak-kesarkar
1160-crore-package-for-teachers-all-demands-accepted-benefit-to-60-thousand-teachers-education-minister-deepak-kesarkar

मुंबई: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रामुख्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षांपर्यंत वाढवण्याला मान्यता देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

आज मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ आणि राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ पदावरील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षे असणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करण्याचा महत्वाचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा

जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना पटोले;शिवसेनेचा टोला

“ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here