मोठी बातमी: ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून कडक लॉकडाउन

maharashtra-coronavirus-update-lockdown-in-16-covid-hotspots-of-thane-till-march-31-news-updates
maharashtra-coronavirus-update-lockdown-in-16-covid-hotspots-of-thane-till-march-31-news-updates

मुंबई: राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भागातही कोरोना प्रसार झपाट्याने होत आहे. या हॉटस्पॉटमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून 9 ते 31 मार्चपर्यंत लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश काढले आहेत. maharashtra-coronavirus-update-lockdown-in-16-covid-hotspots-of-thane-till-march-31-news-updates

शहरातील 16 भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून, ठाणे महापालिका प्रशासनाने या भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काढले आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने सरकारने टप्यापटप्याने लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली होती. मात्र, कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, मुंबई-पुण्यासह मराठावाडा आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये करोना संक्रमण वाढलं आहे. त्यामुळे दररोज राज्यातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

हेही वाचा: नवी मुंबईत ‘क्लब नशा’ पब सील; पब चालकांचे धाबे दणाणले

ठाणे महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून आलं. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं उद्रेक झालेल्या भागांना हॉटस्पॉट घोषित केलं आहे.

ठाण्यात या भागांमध्ये लॉकडाउन

१) आई नगर, कळवा
२) सूर्या नगर, विटावा
३) खरेगाव हेल्थ सेंटर
४) चेंदणी कोळीवाडा
५) श्रीनगर
६) हिरानंदानी इस्टेट
७) लोढा माजीवाडा
८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
९) लोढा अमारा
१०) शिवाजी नगर
११) दोस्ती विहार
१२) हिरानंदानी मिडोज
१३) पाटील वाडी
१४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
१५) रुणवाल नगर, कोलबाद
१६) रुस्तोमजी, वृंदावन

हेही वाचा: अजितदादा कौतुकास पात्र; शिवसेनेनं थोपटली पाठ !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here