बापरे : राज्यात दिवसभरात १४,७१८ जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह!

the-top-10-districts-where-maximum-active-cases-are-concentrated-are-from-maharashtra Union -Health -Secretary -Rajesh- Bhushan-covid-19-news-updates
the-top-10-districts-where-maximum-active-cases-are-concentrated-are-from-maharashtra Union -Health -Secretary -Rajesh- Bhushan-covid-19-news-updates

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच आहे. राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. राज्यातील आकडा सध्या सात लाखांच्या पुढे गेला असून, गुरूवारीही १४ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं गर्दीला आळा घालण्याबरोबरच लोकांच्या चाचण्या करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. कोरोना चाचण्यांमुळे मागील काही दिवसांपासून राज्यात दिवसाला मोठ्या रुग्णसंख्येची नोंद होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. गुरूवारी दिवसभरात आढळून आलेल्या व बऱ्या झालेल्या रुग्णसंख्येची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे

“राज्यात आज १४,७१८ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ९,१३६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५,३१,५६३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या १,७८,२३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.४६ टक्के झाले आहे,” असं टोपे म्हणाले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here