Coronavirus updates : महाराष्ट्रात २४ तासांत ८ हजार २९३ नवे कोरोनाबाधित, ६२ मृत्यू

today-newly-9855-patients-have-been-tested-as-positive-in-maharashtra
today-newly-9855-patients-have-been-tested-as-positive-in-maharashtra

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. २४ तासांमध्ये राज्यभरात ८ हजार २९३ नवे कोरोनाबाधित वाढले Maharashtra-Coronavirus-8293-new-covid-19-case असुन, ६२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद Deaths झाली आहे. याचबरोबर ३ हजार ७५३ जण करोनातून बरे देखील झाले आहेत.

राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता २१ हजार ५५ लाख ७० वर पोहचली आहे. राज्यातील मृत्यू दर २.४२ टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.९५ टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७७ हजार ८ आहे. आजपर्यंत राज्यात कोरोनामुळे ५२ हजार १५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 

हेही वाचा: इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ७० नमूने (१३.२३ टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ जण गृहविलगीकरणात असुन, ३ हजार ३३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here