अखेर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

maharashtra-election-commission-announced-date-for-grampanchayat-by-elections-news-update
maharashtra-election-commission-announced-date-for-grampanchayat-by-elections-news-update

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट Coronavirus second wave अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा Delta Plus variant of Corona मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीला  स्थगिती दिली. EC stays on 5 ZP and 55 panchayat samiti election अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, धुळे Dhule, नंदुरबार Nandurbar, अकोला Akola, वाशीम Washim आणि नागपूर Nagpur या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या.

त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही  मदान यांनी सांगितले.

हेही वाचा

Bhima koregaon Case l भीमा कोरेगाव; शरद पवारांचा नोंदवला जाणार जबाब!

डॉ.भागवत कराड राज्यमंत्री हा तर पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्याचा डाव’

Fennel Tea l बडीशेप चहाचे करा सेवन, पचनसंबंधी समस्या होतील दूर

Bank Holiday List July 2021: शनिवार से लगातार 11 दिन बंद रहेंगे बैंक, बाहर जाने से पहले चेक करें कहां-कहां नहीं होंगे कामकाज?

“भारत राज्यघटनेवर चालतो, शास्त्रांवर नाही”; चारधाम यात्रेच्या थेट प्रक्षेपणावरुन हायकोर्टाने सरकारला फटकारले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here