वनअधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अटक

maharashtra-forest-officer-deepali-chavan-suicide-case-dfo-shivkumar-arrested-from-nagpur-news-updates
maharashtra-forest-officer-deepali-chavan-suicide-case-dfo-shivkumar-arrested-from-nagpur-news-updates

अमरावती: हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी forest-officer दीपाली चव्हाण Deepali Chavan यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार Shivkumar यांना अमरावती पोलिसांनी शुक्रवारी नागपुरातून अटक केली. अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांनी शिवकुमार यांना अटक केल्याची माहिती दिली. दक्षिणेतील कर्नाटक karnataka या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर Nagpur रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

गुरूवारी ही घटना घडल्यानंतर शिवकुमार हे शुक्रवारी नागपुर रेल्वे स्टेशनवरून कर्नाटककडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करून आणखी काही वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत का हे तपासून पुढील कारवाई करण्यात येईल असे अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या शिवकुमार यांना अमरावतीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अत्यंत धाडसी स्वभावाच्या चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात

दीपाली चव्हाण आपल्या आईसोबत हरिसाल येथे सरकारी निवासस्थानात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला गाडी करून देऊन बाहेरगावी पाठवले. गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.

हेही वाचा: Bhandup Hospital Fire | मुंबई – भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, दहा जणांचा होरपळून मृत्यू

म्हणून त्यांच्या आईने हरिसाल येथे शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले. गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनची कारवाईची मागणी

सुसाईड नोटमध्ये उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनीच त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे विनोद शिवकुमार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनने केली आहे. या बाबतचे लेखी निवेदन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना कळवूनही त्यांनी यावर कोणतीही कारवाई न करता उलट उपवनसंरक्षक शिवकुमार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.

या आत्महत्येला फक्त शिवकुमारच नाही तर रेड्डीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे लवकरात लवकरात त्यांची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ शासन सेवेतून बडतर्फ करावे. अन्यथा महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशन मार्फत या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. व त्यांना निलंबित करेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here