आनंदवार्ता: राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची सर्वात मोठी भरती

महाविकास आघाडी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

maharashtra-government-has-decided-12500-more-police-personnel-will-be-recruited
राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती maharashtra-government-has-decided-12500-more-police-personnel-will-be-recruited

मुंबई :  करोना संकटात महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा सर्वात मोठा निर्णय घेतला. सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

अनिल देशमुख म्हणाले, आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे”.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here