समीर वानखेडेंच्याविरोधात अखेर ठाकरे सरकारची चौकशीची घोषणा, हे 4 अधिकारी करणार चौकशी!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे.

maharashtra-government-mumbai-police-appoints-a-4-member-team-to-investigate-the-extortion-allegations-against-ncb-zonal-director-sameer-wankhede-news-update
maharashtra-government-mumbai-police-appoints-a-4-member-team-to-investigate-the-extortion-allegations-against-ncb-zonal-director-sameer-wankhede-news-update

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने 4 अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे. एकीकडे नवाब मलिकांच्या (Nawab Malik) आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रिलीज करण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसं फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे.

प्रभाकर साईल, अॅड सुधा द्विवेदी, अॅड कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी 4 पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे. गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हे चार अधिकारी समीर वानखेडे चौकशी करणार?

1 मिलिंद खेतले सहायक पोलिस आयुक्त

2 अजय सावंत पोलिस निरीक्षक

3 श्रीकांत पारकर सहायक पोलिस निरीक्षक

4 प्रकाश गवळी पोलिस उप निरीक्षक

प्रभाकर साईलचे आरोप धक्कादायक आरोप, 25 कोटींच्या डीलचा दावा

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. “केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ”, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

हेही वाचा : kiran Gosavi Arrested :एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावीला अखेर बेड्या!

त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

समीर वानखेडेंविरोधात वकिलाची तक्रार

अॅड. कनिष्ठ जयंत यांच्या माहितीनुसार, आर्यन खान क्रुझ प्रकरणातील मी एक तक्रारदार आहे. 12 आणि 16 ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात केपी गोसावी, मनिष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात मी तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटीतपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचं अपहरण केलं आणि कोट्यावधी रुपयांची खंडणी त्याच्या सुपरस्टार वडिलांकडून मागितली. अशा स्वरुपाची लेखी तक्रार अर्ज मी दाखल केला आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. एका प्रकारे फिल्म इंडस्ट्रिजवर दबाव आणण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करण्यात आला आहे, अशा स्वरुपाची तक्रार करण्यात आल्याचं जयंत यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here