अखेर ई-पासची अट रद्द; लोकल,मेट्रोला ब्रेक

खासगी,मिनी बसेसना परवानगी, हॉटेल आणि लॉज यांनाही मुभा

maharashtra-mission-begin-again-guideline-announced
maharashtra-mission-begin-again-guideline-announced

मुंबई : राज्य सरकारने नियमावली जाहीर करताना ई-पासची अट रद्द केली आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. आता ई-पासशिवाय राज्यात प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारनं ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून अनलॉक-४चा टप्पा सुरू होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला ‘अनलॉक ३’ चा टप्पा ३० ऑगस्ट रोजी संपत असून केंद्र सरकारकडून ३० सप्टेंबपासून अनलॉक ४ टप्पा सुरु होईल अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार राज्य सरकारने आज सोमवारी निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.

खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी

याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. आहेत.

मंगळवारपासून दररोज २०० उड्डाणांना परवानगी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज २०० उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून १०० विमाने जाणार व १०० येणार. यापूर्वी आतापर्यंत करोना संकटामुळे हा आकडा ५०-५० असा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here