बापरे l राज्यात दिवसभरात आढळले ४ हजार कोरोनाबाधित रुग्ण

२ हजार ७०७ जण कोरोनामुक्त, राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्के

india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update
india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update

मुंबई l महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात आज शनिवार 14 नोव्हेंबर रोजी दिवसभरात  ४ हजार २३७ नवे कोरोनाबाधित आढळले.Maharashtra-covid19-cases तर, २ हजार ७०७ जण कोरोनामुक्त झाले. १०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.maharashtra-reports-4237-new-covid19-cases

राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १६ लाख १२ हजार ३१४ जण करोनामुक्त झाले आहेत.Maharashtra-covid19-cases सध्या राज्यात ८५ हजार ५०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ४५ हजार ९१४ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली तरी कोरोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्य़ातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्य़ांना दिल्या आहेत.

तसेच कोरोना आणि बिगरकरोना उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेशही सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा l बिहारमध्ये जेडीयू-भाजपात मंत्रीपदावरून पेटला वाद; भाजपनेते दिल्लीत

कोरोना साथीच्या काळात सरसकट सर्वच आरोग्य व्यवस्था कोरोना केंद्री झाल्याने इतर आजारांच्या सेवा काही प्रमाणात खंडित झाल्या होत्या. आधुनिक उपचार देणारी सुपरस्पेशालिटी रुग्णालये कोरोना रुग्णालये म्हणून कार्यरत असल्याने तातडीच्या नसलेल्या अनेक शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत.

हेही वाचा l राहुल गांधी प्रकरणी बराक ओबामांवर शिवसेनेचा हल्लाबोल

संसर्गाची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याने आता इतर आजारांच्या सुविधाही उपलब्ध करण्याच्या उद्देशातून रुग्णोपचार व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here