ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी,शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

varsha-gaikwad-comment-on-maharashtra-school-opening-decision-amid-corona-omicron-infection-news-update
varsha-gaikwad-comment-on-maharashtra-school-opening-decision-amid-corona-omicron-infection-news-update

मुंबई l कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. टास्क फोर्सकडून मिळालेल्या नव्या सूचनेनुसार, राज्यातील शाळा सुरू होणार आहे. 

या निर्णयानंतर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील ५ ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तर शाळेत उपस्थितीची सक्तीची राहणार नसून पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. शाळा सुरु करण्याअगोदर आजारी मुलांना कसं शोधायचं? त्याच्या संदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे.

यासोबतच पालकांनी काय काळजी घ्यायची या संदर्भातही आम्ही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सने दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल. तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही 4 ऑक्टोबरला शाळा सुरु करत असल्याची माहिती देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

केंद्रातील मोदी सरकारमुळेच सोयाबीनला मातीमोल किंमत !: नाना पटोले

Maharashtra Schools Reopening Decision l महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार; आघाडी सरकारचा निर्णय!

‘हिंदू खतरे में है’ हा निव्वळ जुमला, केंद्राचा खुलासा, भाजपवर 302 खाली गुन्हा दाखल करा!  

राज्यपाल महोदय 12 सदस्यांची नावे मंजूरही करत नाहीत, त्यावर बोलायलाही ते तयार नाहीत!

बापरे! ठाण्यात सूरज वॉटर पार्कमध्ये आढळली 7 फूट लांब मगर

Weather Updates: मध्य प्रदेश-गुजरात सहित दक्षिण के इन राज्यों में अगले पांच दिनों तक बारिश का अलर्ट, मौसम के ताजा अपडेट

Realme लाया नया गेमिंग स्मार्टफोन, ये है कीमत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here