Maharashtra TET -2019 l टीईटी पात्र उमेदवार एका वर्षापासून गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत,शिक्षण विभागाचे दुर्लक्ष!

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून पात्र उमेदवारांना प्रतिसाद नाही,पालकांचा आरोप

maharashtra-TET-2019-maharashtra-teacher-eligibility-test-result-pending-education-minister-varsha-gaikwad-maharashtra-state-council-of-examanation-pune
maharashtra-TET-2019-maharashtra-teacher-eligibility-test-result-pending-education-minister-varsha-gaikwad-maharashtra-state-council-of-examanation-pune

मुंबई l महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी TET ची Maharashtra Teacher Eligibility Test -2019 (19 जानेवारी 2020) ला परीक्षा झाली होती. निकालही जाहीर झाले, परंतु काही हजारो पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे येथून गुणपत्रिका अद्यापही मिळाली नाही. विशेष म्हणजे (MAHA TET 2021) साठी रजिस्ट्रेशन (3 ऑगस्ट 2021) सुरु झालं आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे च्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) २०१९चे आयोजन करण्यात आले होते. १९ जानेवारी २०२० ला विद्यार्थ्यांची परीक्षा झाली होती. निकालही जाहीर झाले. परंतु हजारो पात्र विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून परीक्षा दिली होती त्या जिल्हातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभातून गुणपत्रिका दिली जाते. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे येथून गुणपत्रिका जिल्हा परिषदांमध्ये पाठवण्यात आल्या नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांची अडचण झाली आहे.

पात्र उमेदवार वर्ष उलटला तरी गुणपत्रिकेची वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने (MAHA TET 2021) साठी रजिस्ट्रेशन (3 ऑगस्ट 2021) सुरु केलं आहे. पात्र उमेदवारांची गुणपत्रिकेसाठी धावपळ सुरु आहे परंतु शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे दुर्लक्ष,पालकांचा आरोप

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पालकांना तक्रारी करुन सुध्दा वर्षा गायकवाड यांनी याकडे लक्ष दिले नाही असा आरोपही पालकांनी केला आहे. गुणपत्रिका मिळाल्या नाही तर आम्हा आंदोलन करावा लागेल असा इशारा पालकांनी दिला आहे.

शिक्षण विभागाने (MAHA TET 2021) साठी रजिस्ट्रेशन (3 ऑगस्ट 2021) सुरु केलं आहे. लाखो डिएड,बीएड पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतील. त्यांच्याकडून करोडो रूपये शासनाच्या तिजोरीत जमा होतील. करोडो रुपयांसााठी ह्या परीक्षा घेतल्या जात आहे का असाही प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षक भरती नाही. फक्त हजारो पात्र विद्यार्थी अद्यापही बेरोजगार आहेत. त्यांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here