Eknath Shinde l नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 56 व्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण

एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच भावूक ट्विट

Chief Minister Shinde says We are determined to solve the problems of development in Marathwada
Chief Minister Shinde says We are determined to solve the problems of development in Marathwada

मुंबई l राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे. maharashtra-urban-development-minister-eknath-shinde  

पदवी परीक्षेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावूक ट्विट केलं आहे. “लहान वयातच घराची जबाबदारी खांद्यावर आल्याने एकनाथ शिंदे साहेब यांना एका मत्स्य वाहतूक व्यवसाय कंपनीत वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी नोकरीला सुरुवात करावी लागली.

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिंदे साहेबांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले, पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा प्रयत्नांती परमेश्वर या म्हणींचा प्रत्यय मला घरातच एकनाथ शिंदे यांच्या अथक व अविश्रांत मेहनतीच्या रूपातून पाहायला मिळतो.

अखंड,अविश्रांत मेहनतीची तयारी व जिद्द असेल तर आयुष्यात यशस्वी होता हे शिंदे साहेबांच्या आजच्या निकालातून सिद्ध होतं”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी भावना व्यक्त केल्यात.

हेही वाचा l धक्कादायक l विजेच्या धक्क्यात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू 

एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा l walnuts Benefits अक्रोड खाण्याचे 10 फायदे जाणून घेऊयात

शिक्षणाला वयाची अट नसते असं म्हटलं जातं, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here