हॉटेल, रेस्तराँ आणि बार, खासगी वाहतुकीसाठीचे आजपासून असे आहेत नियम

maharashtra-weekend-lockdown-weekend-lockdown- break-the-chain- rules-and-guidelines-for-hotel-restaurant-bar-guidelines-for-private-transport-news-updates
maharashtra-weekend-lockdown-weekend-lockdown- break-the-chain- rules-and-guidelines-for-hotel-restaurant-bar-guidelines-for-private-transport-news-updates

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज 5 एप्रिल रात्री 8 वाजेपासून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध कठोर केले आहे. हॉटेल, रेस्तराँ, बार आणि खासगी वाहतुकीवर बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. संचारबंदी आणि लॉकडाउनच्या काळात वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना कऱण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने याबद्दले आदेश काढले असून, सूचनांची यादीही प्रसिद्ध केली आहे. maharashtra-weekend-lockdown-weekend-lockdown-break-the-chain-rules-and-guidelines-for-hotel-restaurant-bar-guidelines-for-private-transport-news-updates

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कडक निर्बंधासंदर्भातील नियमावली निश्चित करण्यात आली. संचारबंदी आणि लॉकडाउनच्या कालावधीसाठी वेगवेगळे नियम हॉटेल, रेस्तराँ आणि बारसाठी निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दंडाची तरतूदही नियमावलीत करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: राज्यात आजपासून 30 एप्रिलपर्यंत काय सुरु, काय बंद?, जाणून घ्या संपूर्ण यादी!

हॉटेल, रेस्तराँ आणि बारसाठीचे नियम

>>३० एप्रिलपर्यंत सर्व रेस्तराँ आणि बार बंद ठेवावे लागणार आहेत.
>>रेस्तराँना ग्राहकांना पार्सल सेवा किंवा होम डिलीव्हरी सेवा देण्यासाठी मूभा असेल. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंतच ही सेवा देता येणार आहे.
>>आठवड्याच्या शेवटी असणाऱ्या लॉकडाउनच्या काळात म्हणजेच शनिवारी आणि रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी सेवा देण्यास परवानगी. ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवणाचं पार्सल नेता येणार नाही.
>>निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्तराँ यांना केवळ हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पाहुण्यांनाच सेवा देण्याची मूभा.
>>१० एप्रिलपासून रेस्तराँतून डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RT-PCR कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहेत.
>>कोरोना निगेटिव्ह RT-PCR चाचणीचा रिपोर्ट १५ दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा चाचणी करण्याचे आदेश आहेत.
>>RT-PCR चाचणी रिपोर्ट नसल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
>>हॉटेल, रेस्तराँ इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोना लसीकरण लवकर करुन घ्यावं, असंही नियमावलीत म्हटलेलं आहे.

हेही वाचा: कोरोनाचा हाहाकार! देशात २४ तासांत 1 लाख नवे रुग्ण; ५०० मृत्यू

खासगी वाहतूक व्यवस्थेविषयीचे नियम

>>खासगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे.
>>शुक्रवारी (९ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी (१२ एप्रिल) सकाळी ७ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास बंदी.
>>केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठीच खासगी वाहनांना शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत प्रवास करण्यास परवानगी.
>>खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफचं करोना लसीकरण लवकर करून घेण्याचे निर्देश.
>>१० एप्रिलपासून खासगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोना RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
>>कोरोना निगेटिव्ह RT-PCR चाचणी रिपोर्ट १५ दिवसाच्या कालावधीसाठीच असणार आहे. त्यानंतर पुन्हा चाचणी करावी लागणार.
>>RT-PCR चाचणी रिपोर्ट नसेल तर १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here