महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव सहन करणार नाही; उध्दव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका

cm-uddhav-thackeray-slams-parambir-singh-over-complaint-and-court-case-and-enquiries-news-update
cm-uddhav-thackeray-slams-parambir-singh-over-complaint-and-court-case-and-enquiries-news-update

मुंबई :  मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव अजिबात सहन करणार नाही.  जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. मी आज बोलणार नाही. मलाही बोलता येतं. मुख्यमंत्र्याचा मास्क बाजूला करुन एक दिवस मी भाष्य करणार आहे. असा इशारा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला.

उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. गेले काही महिने आपण करोनाचा सामना करतो आहोत. हे वर्षच कोरोना काळात गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी सुरुवातीला सर्व धर्मीयांचे आभार मानतो. सणासुदीचे दिवस असूनही सगळ्या धर्मातील लोकांनी संयम पाळून आपण सगळ्यांनी करोना काळात सहकार्य केलं त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद देतो.

पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका

पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. आयुष्याची गाडी आपण मार्गावर आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. करोनाचं संकट वाढता वाढता वाढे अशी या करोनाची परिस्थिती आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दोन दिवसांचं आपलं अधिवेशन पार पडलं आहे. या दोन दिवसात सर्वपक्षीयांनी चांगलं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईत मास्क लावताना शिथीलता आलेली दिसते आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही.

कदाचित जगावरचं पहिलं महाभयंकर संकट आहे

मला वाटतं की इतर देशांमध्ये लॉकडाउन संपवला आहे पण कायदे कडक केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नाही तर दंड ठेवला जातोय. गर्दी झाली की दुकान बंद केलं जातं असे कायदे करायची गरज लागायला नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आयुष्यात हे संकट हे कदाचित जगावरचं पहिलं महाभयंकर संकट आहे त्याचा सामना आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. आता मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here